Monday, December 23, 2024
HomeBlogटी20 वर्ल्डकप स्पर्धा मोबाईल वर मोफत पाहता येणार! कसे आणि कुठे ते...

टी20 वर्ल्डकप स्पर्धा मोबाईल वर मोफत पाहता येणार! कसे आणि कुठे ते जाणून घ्या

वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले असून पाच-पाच संघांचे चार गट आहेत. भारत अ गटात असून यात पाकिस्तानचा संघही आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात वेळेचा खूपच फरक आहे. त्यामुळे भारतीय वेळ लक्षात घेऊन त्याचं नियोजन केलं गेलं आहे. सराव सामन्यादरम्यान या तयारीचा ट्रेलर समोर येईल. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे सामने टीव्ही आणि मोबाईल लाईव्ह पाहण्यासाठी काय सुविधा आहे ते जाणून घेऊयात

आयपीएल 2024 स्पर्धा विनामूल्य जिओ सिनेमावर पाहात येत आहे. तसेच टीव्हीवर पाहण्याासाठी स्टार स्पोर्ट्सचा पर्याय आहे. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धा जिओ सिनेमावर पाहता येणार नाही.

तुम्हाला टी20 वर्ल्डकप स्पर्धा पाहण्यासाठी मोबाईल सोयिस्कर पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सर्व प्रथम मोबाईलमध्य डिस्ने हॉट स्टार अॅप डाऊनलोड करा. कारण डिस्ने हॉट स्टारने वर्ल्डकपचे हक्क विकत घेतले आहेत.

डिस्ने हॉट स्टारने जाहीर केले आहे की, सर्व विश्वचषक सामने पूर्णपणे विनामूल्य पाहण्यासाठी उपलब्ध असतील. यासाठी तुम्हाला त्याची सदस्यता घेण्याची गरज नाही. डिस्ने हॉट स्टार ॲप डाउनलोड करावे लागेल आणि तुम्हाला विनामूल्य सामने पाहता येतील.

सामन्यांच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात काही सामने सकाळी 6 वाजता सुरू होणार. तर काही सामने रात्री 8 वाजता सुरू होतात. जर टीम इंडिया सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचली तर मॅच सुरू होण्याची वेळ बदलली जाईल. हे अपडेट नंतर केले जाईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -