पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा करण्यास मंजुरी दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी याविषयीचा पहिला निर्णय घेतला. हप्ता जमा झाला की नाही ते असे तपासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेतंर्गत 17 वा हप्ता जमा करण्यास मंजुरी दिली आहे. त्याची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा होतात.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.
pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.
ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा.