Tuesday, August 26, 2025
Homeयोजनानोकरीपशुसंवर्धन विभागात नोकरीची संधी, बारावी उत्तीर्ण, पदवीधरांना प्राधान्य, जाणून घ्या निवडप्रक्रीया..

पशुसंवर्धन विभागात नोकरीची संधी, बारावी उत्तीर्ण, पदवीधरांना प्राधान्य, जाणून घ्या निवडप्रक्रीया..

तूम्ही जर बारावी पास किंवा पदवीधर असाल तर सरकारी नोकरी करण्याची तुम्हाला संधी आहे. पशुसंवर्धन विभागात दोन पदांसाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. केंद्र शासनाची राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM-National Livestock Mission) या योजनेअंतर्गत व पशुसंवर्धन विभागाने कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर या दोन पदांसाठी सूचना काढली आहे.

 

कोणत्या पदांसाठी आहे संधी?

 

व्हेटर्नरी ग्रॅज्यूएट – ५६००० प्रतिमाह

 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी, पदव्यूत्तर पदवी

 

एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

 

शासकीय सेवेतील अथवा शासन अंगीकृत उपक्रम, योजना, प्रकल्प इ मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास किंवा सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य

 

डाटा एन्ट्री ऑपरेटर- २०००० प्रतिमाह

 

किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण, पदवीधर असल्यास प्राधान्य

 

एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

 

इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण

 

डाटा एंट्री ऑपरेटर पदावर किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव, शासकीय विभाग, उपक्रम, योजना, प्रकल्प इ काम केलेले असल्यास प्राधान्य

 

अर्जाची अंतिम तारीख

 

या पदांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २० जून २०२४ असून या पदांच्या अधिक तपशील, अर्ज, निवड पद्धती, अटी शर्ती, कामाचे स्वरूप इ बाबत पशुसंवर्धन विभागाच्या www.ahd.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -