Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! आता ज्येष्ठ नागरिकांना घरूनच करता येणार बँकांचे व्यवहार, सरकारची नवीन...

मोठी बातमी! आता ज्येष्ठ नागरिकांना घरूनच करता येणार बँकांचे व्यवहार, सरकारची नवीन कार्यपद्धती काय?

जेष्ठ नागरिकांसाठी सरकारनं नवीन कार्यपद्धती लागू केली आहे. जेष्ठ नागरिकांना घरुनच बँक व्यवहार करण्याची मुभा देण्यात आलीय.

आजारपणामुळं किंवा वय झाल्यामुळं निवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी शासनानं हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय अर्थखात्यानं 11 जून रोजी जाहीर केला आहे.

बँक अधिकाऱ्यांसमोर अंगठ्याचा ठसा घेण्याची मुभा

दरम्यान, शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार, संयुक्त बँक खात्याची सुविधा उपलब्ध करणे, बँकांचे व्यवहार करण्यासाठी पालक नियुक्ती करणं आणि प्रत्यक्ष उपस्थित राहणं. हे शक्य नसेल तर पैस काढण्याची पावतीवर स्वाक्षरी करणं, स्वाक्षरी करता येत नसेल तर बँक अधिकाऱ्यांसमोर अंगठ्याचा ठसा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे निवडत्ती वेतन बँक खात्यात जमा केले जाते. गरजेप्रमाणं त्यातून रक्कम काढली जाते. मात्र, आजारपणामुळं किंवा वय जास्त झाल्यामुळं बँकेत जाणं शक्य होत नाही, किंवा हालचाल करता येत नाही. त्यामुळं शासनानं नवीन कार्यपद्धती लागू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -