ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन शहापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अलायन्स हॉस्पिटलच्या योग शिक्षिका डॉक्टर दीपश्री पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिके देत सखोल मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकांमध्ये 1 हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम अलायन्स हॉस्पिटल आणि हुतात्मा अब्दुल हमीद विद्यामंदिर, सरोजिनी नायडू विद्यामंदिर, नेहरू विद्यामंदिर, राजीव गांधी विद्यामंदिर, कामगार भवन, जॉईंट ग्रुप ऑफ उत्कर्ष शैली शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अलायन्स हॉस्पिटलच्या सीईओ आयेशा राऊत, सदानंद गायकवाड सर, प्रियंका कुंभार, जयेंट्स ग्रुपच्या अध्यक्षा राजश्री माने, ज्योती माने, भोसले यांच्यासह वरील सर्व विद्यामंदिर चे मुख्याध्यापक शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. प्रात्यक्षिका नंतर खाऊ वाटप करण्यात आला.
दरम्यान अलायन्स हॉस्पिटल तर्फे सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. यातीलच हाही एक भाग होता. अशा समाज उपयोगी उपक्रमाबद्दल परिसरातून अलायन्स हॉस्पिटल बद्दल चांगले कौतुक होत आहे.