Wednesday, December 18, 2024
Homeब्रेकिंगआनंदाची बातमी!शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

आनंदाची बातमी!शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

“पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं असून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत…त्यानुसारच मंत्रिमंडळाने किमान आधारभूत किंमतचे दर निश्चित केले आहेत”

बुधवारी १९ जून रोजी केंद्रीय मंत्री मंडळाची सलग दुसरी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयात एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सरकार च्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकी नंतरच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. “पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं असून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. १४ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केल्याची माहिती दिली. मंत्रिमंडळाने खरीप हंगामातील १४ पिकांसाठी वाढीव किमान आधारभूत किंमत मंजूर केली आहे. त्यानुसार, कापसाला ७१२१ रुपये, भाताला २३०० रुपये किमान आधारभूत किंमत मंजूर करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच १४ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केल्याने सरकारच्या तिजोरीवर सुमारे २ लाख कोटी रुपयांचा भर पडले. २०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या किंमतीच्या किमान दीडपट किमान आधारभूत किंमत दिली जाईल, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसारच मंत्रिमंडळाने किमान आधारभूत किंमतचे दर निश्चित केले आहेत ” असे ते म्हणाले.

किमान आधारभूत किंमत ही केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी निश्चित करण्यात येत असलेली पिकांची/धान्यांची अथवा कृषी उत्पादनांची किंमत असते. त्यानुसार सरकार शेतकऱ्यांकडून धान्यखरेदी करते. हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रीमंडळ घेत असते. कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोग अशा वाढीबाबत आपली शिफारस केंद्र सरकारला सादर करत असते. त्या शिफारसीनुसार केंद्रीय मंत्रीमंडळ आपला निर्णय जाहीर करते. या संबंधीची तरतूद त्या-त्या वर्षाच्या अर्थसंकल्पात पूर्वीच करण्यात आलेली असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणारा त्या धान्याचा भाव, मागील वर्षीचा खरेदी भाव, मागणी व पुरवठा, साधारणतः पेरणीचे क्षेत्र आदी अनेक गोष्टींवर ही किंमत ठरविली जाते.

तांदूळ : २३००रुपये

तूर डाळ : ७५५० रुपये

उडीद डाळ : ७४०० रुपये

मूग डाळ : ८६८२ रुपये

शेंगदाणे :६७८३ रुपये

कापूस : ७१२१ रुपये

ज्वारी : ३३७१ रुपये

बाजरी : २६२५ रुपये

मका : २२२५ रुपये

नाचणी : ४२९० रुपये

तीळ : ८७१७ रुपये

सूर्यफूल : ७२३० रुपये

सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या सर्व पिकांचे भाव आता प्रतिक्विंटल इतका असले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -