Sunday, December 22, 2024
Homeक्रीडागौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच बनणार की नाही ? नव्या विधानाने...

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच बनणार की नाही ? नव्या विधानाने खळबळ..

बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या नव्या कोचची घोषणा कधी करण्यात येईल, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. मात्र त्यापूर्वीच या प्रश्नावर गौतम गंभीरने केलेल्या ताज्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपर्यंत गौत गंभीर हाच भारतीय संघाचा नवा, मुख्य प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्याने नुकतेच केलेले विधान ऐकल्यावर हा मुद्दा अजून काही अंतिम निर्णय झालेला नसल्याचं दिसून येतंय. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आणि IPL 2024 मध्ये KKR चे मार्गदर्शक गौतम गंभीर याला, कलकत्त्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर गंभीर याने थेट उत्तर देणं टाळलं. ‘ मी सध्या जिथे आहे तिथे आनंदी आहे, फार पुढचा विचार करत नाहीये’ , असं गंभीर म्हणाला.

सध्या सुरू असलेला T20 वर्ल्डकप 2024 संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर हा भारतीय संघाचान वा मुख्य प्रशिक्षक बनणार अशा बातम्या येत होत्या. या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते, तेव्हा केवळ गंभीर यानेच बीसीआयकडे प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केल्याचेही वृत्त समोर आले होते. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षक होण्यासाठी ज्या एका व्यक्तीची मुलाखत घेतली होती, ती व्यक्ती गौतम गंभीर होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र मीडिया रिपोर्ट्सनंतर, गंभीरने जे वक्तव्य केले, त्यामुळे मुख्य प्रशिक्षकाचा प्रश्न आणखी काही काल तरी सुटणार नसल्याचे स्पष्ट होतंय.

काय म्हणाला गंभीर ?

कोलकाता येथे गौतम गंभीर याने पीटीआयशी संवाद साधला, त्याला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, सध्या या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मी इतका पुढचा विचारही करत नाही. सध्या मी एवढेच सांगू शकतो की मी जिथे आहे तिथे मी आनंदी आहे. गंभीरच्या या विधानामुळे संपूर्ण देशवासियांची उत्सुकता ताणली गेली आहे.

नेमकं काय झालं ?

रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयनेच गौतम गंभीरशी संपर्क साधला होता. मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवल्यानंतरही बोर्ड गंभीरच्या सतत संपर्कात होता. यामुळे गंभीर हा भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल असे वाटत होते. पण, गंभीरच्या वक्तव्यानंतर त्या अटकळींना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. अशा परिस्थितीत आता बीसीसीआय यासंदर्भात काय अधिकृत वक्तव्य करेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -