Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : 10 कोटीच्या फसवणूक प्रकरणी आणखी एकास अटक

इचलकरंजी : 10 कोटीच्या फसवणूक प्रकरणी आणखी एकास अटक

बँकेचा बोजा नसल्याचा बनावट सहीचा बनावट दाखला, आयसीआयसीआय बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आणि नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना आदींच्या सहाय्याने ९ कोटी ९९ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक प्रकरणात आणखीन एका संशयिताला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख आयाज उर्फ बबलू मुल्ला (वय ३२ रा. काँग्रेस कमिटीमागे) असे त्याचे नांव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अटकेत असलेल्या शितल आदिनाथ केटकाळे हा न्यायालयीन कोठडीत आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे ९ कोटी ९९ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्या प्रकरणी अजितकुमार आदिनाथ उर्फ आदिशा केटकाळे यांच्या फिर्यादीवरुन शितल आदिनाथ केटकाळे व सौ. वैशाली शितल केटकाळे (दोघे रा. नमोकार बिल्डिंग कोल्हापूर रोड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी शितल केटकाळे याला अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर प्रकरणाच्या तपासात आणखीन ५ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामध्ये बनावट बांधकाम परवाना तयार करुन देणाऱ्या शाहरुख मुल्ला याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -