मोबाईलमध्ये कोणतेही काम करायचे असो; सगळ्यात आधी इंटरनेट आहे का हे तपासून पाहावे लागते. अगदी तिकीट बुक करण्यापासून ते एखाद्याला पैसे पाठविण्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टींसाठी इंटरनेट उपलब्ध असणे गरजेचे ठरते. त्यामुळे विविध टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स घेऊन येत असतात. अशातच काल रिलायन्स जिओ कंपनीने त्यांच्या मोबाइल सेवांचे दर वाढवून, नवीन यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता एअरटेलनेही आपली सेवा महाग केल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार हे निश्चित झाले आहे.
एअरटेलने त्यांचे नवीन मोबाईल प्लॅन्स जाहीर केले आहेत. हे नवीन शुल्क दर Bharti Hexacom Ltd. सह सर्व ग्राहकांना लागू होतील. एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सर्व योजनांसाठीचे नवीन शुल्क दर ३ जुलैपासून लागू होणार आहेत. या मोबाईल प्लॅन्सच्या नवीन शुल्क दरांवर आपण एकदा नजर टाकू…
१.अनलिमिटेड व्हॉइस प्लॅन्स –
१. १७९ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क १९९ रुपये करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता, २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस मिळणार आहेत.
२. ४५५ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क ५०९ रुपये करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता, ६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस दिले जातील.
३. १७९९ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क १९९९ रुपये करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता, २ जीबी डेटा,अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस दिले जातील.
२. डेली डेटा प्लॅन्स –
२८ दिवसांच्या डेली डेटा प्लॅन्सच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे आणि ती खालीलप्रमाणे…
१. २६५ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क २९९ रुपये करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ मिळू शकतो.
२. २९९ रुपये प्लॅनच्या शुल्कात वाढ करून, ते ३४९ करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस दिले जातील.
३. ३५९ रुपयांचा प्लॅन ४०९ रुपये करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्हाला २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस इत्यादी फायदे मिळतील.
४. ३९९ रुपये प्लॅनचे शुल्क ४४९ रुपये करण्यात आले आहे. त्यामध्ये ग्राहक ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ घेऊ शकतात.
तसेच ५६ दिवसांसाठी वैध असणाऱ्या ४७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस दिले जायचे. त्याची किंमत आता ५७९ रुपये करण्यात आली आहे. तसेच ५४९ रुपयांचा प्लॅन आता तुम्हाला ६४९ रुपयांमध्ये मिळेल; त्यात तुम्हाला २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएसचा लाभ घेता येईल. तसेच ७१९ व ८३९ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता ८५९ व ९७९ रुपये करण्यात आली आहे. तसेच वर्षभराचा म्हणजेच ३६५ दिवस वैध असणारा प्लॅन रिचार्ज करण्यासाठी आता तुम्हाला ३,५९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
३. डेटा बूस्टर प्रीपेड प्लॅन्सवर सुद्धा नजर टाकूयात…
१९ रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन २२ रुपये, तर २९ रुपयांचा प्लॅनची किंमत ३२ रुपये करण्यात आली आहे आणि ६५ रुपयांचा प्लॅन आता तुम्हाला ७७ रुपयांमध्ये मिळणार आहे. एकूणच सर्व रिचार्ज प्लॅनचे नवीन दर पाहता ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे असे दिसून येत आहे.