Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रआजपासून देशात होणार ‘हे’ मोठे बदल; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका

आजपासून देशात होणार ‘हे’ मोठे बदल; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका

जुलै महिन्याला सुरुवात झालेली आहे. आणि पहिल्या दिवसापासून अनेक गोष्टींमध्ये बदल देखील झालेला आहे. बँकिंग तसेच इतर सेवा संबंधित देखील बदल झालेले आहे. याच प्रमाणे डिजिटल वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि गॅस सिलेंडरमध्ये देखील काही बदल लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. आता जुलै 2024 मध्ये कोणकोणते बदल होणार आहेत? हे आपण जाणून घेऊयात.

गॅस सिलेंडर स्वस्त झाला | Financial Rule

1 जुलै 2024 पासून एलपीजी सिलेंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा भाव हा 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारे बदल केलेला नाही.

कारच्या किमतीत वाढ

1 जुलै 2024 पासून कार खरेदी करणारे लोकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. आता टाटा मोटर्सच्या व्यवसायिक वाहनांची किंमत वाढवण्यात येणार आहे. हिरो मोटो कॉर्पच्या निवडक स्कूटर आणि मोटरसायकल मॉडेलच्या किमतीत आता दीड हजार रुपये वाढलेले आहेत.

सिम कार्ड पोर्टचे नियम देखील बदलणार

सिम कार्ड संबंधित अनेक नियम बदलण्यात आलेले आहेत. 1 जुलै पासून आता याची अंमलबजावणी होणार आहे. केल्यानंतर ग्राहकाला 7 दिवस सिम चालू होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

फास्टॅग सेवा शुल्क वाढणार

1 जुलैपासून आता ग्राहकांना टॅग व्यवस्थापन माहिती दर तीन महिन्यांनी पेमेंट प्राप्त करण्यासाठी फास्टट्रॅक सेवा देणाऱ्या कंपनी बँकिंग कंपन्या शुल्क भरावे लागेल.

क्रेडिट कार्ड बिलचे पेमेंट नियम बदल

क्रेडिट कार्ड पेमेंट संबंधीच्या अनेक बदल झालेले आहेत. काही पेमेंट प्लॅटफॉर्मवर आता बिल भरण्यास समस्या होऊ शकतात. त्यामुळे आता आरबीआयच्या नवीन बदलानुसार 1 जुलैपासून क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठी BBPS वापरण्यात येईल.

मोबाईल रिचार्ज महाग | Financial Rule

जिओ, एअरटेल आणि वोडाफोन सारख्या कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल रिचार्ज दरामध्ये बदल देखील केलेले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हे बदल लागू करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -