Tuesday, August 5, 2025
Homeब्रेकिंगदारुच्या नशेत मुलीचा हात पकडला, जमावाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

दारुच्या नशेत मुलीचा हात पकडला, जमावाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

मुलीची छेड काढणे मद्यपीला चांगलेच महागात पडले आहे. मद्याच्या नशेत मुलीचा हात पकल्यामुळे जमावाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे घडली. भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) असे जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मयताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे हा आसोदा गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी काय घडली घटना

जळगाव तालुक्यातील आसोदा गावात भास्कर दगडू भंगाळे आपल्या कुटुंबासह राहतात. शेतांमध्ये मजुरी करून ते परिवाराचा चरितार्थ चालवत होते. गुरुवारी दुपारी आसोद्यात असताना त्यांनी मुलीचे छेड काढल्याचा आरोप झाला. त्यासंदर्भात गावातील काही जणांनी त्यांना जाब विचारला.

 

यानंतर घटनास्थळी जमाव जमा झाला. त्या जमावाकडून भास्कर भंगाळे यांना बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांचा तपास सुरु

आसोदा येथील या घटनेनंतर गावात खळबळ निर्माण झाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहचले. त्यांनी घटनेचा तपास सुरु केला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भास्कर भंगाळे यांनी खरंच मुलीची छेड काढली होती का? त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत. या घटनेचे पडसाद उमटू नये म्हणून आसोद्यात पोलिसांचा बंदोबस्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -