इचलकरंजी
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674 व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी प्रारंभ झाला. आंतरशालेय स्पर्धांचे हे सलग 34 वे वर्ष आहे.
श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवनिमित्त प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते..
रविवारी स्पर्धांचा उद्घाटन समारंभ होऊन इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सहा गटात चित्रकला स्पर्धा सुरू झाली
नामदेव समजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनिल पोरे,मिरजेचे नामवंत वकिल अनिल कोपार्डे यांच्या हस्ते स्पर्धांना प्रारंभ झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले.
श्री संत नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी स्वागत केले
श्री नामदेव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी प्रास्ताविक केले,
स्पर्धेचे उद्घाटक श्री पोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा आंतरशालेय स्पर्धातूनच स्पर्धा स्पर्धा परीक्षांचा अनुभव येतो बक्षीसांपेक्षा स्पर्धांमध्ये सहभाग महत्त्वाचा असे सांगितले तर श्री कोपार्डे यांनी सामूहिक प्रयत्नातूनच यशाचे शिखर गाठता येते त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. प्राध्यापक अनिल अवसरे यांनी सूत्रसंचालन केले तर सुभाष भस्मे यांनी आभार मानले ,नामदेव भवन येथे होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये चित्रकला पाठांतर बुद्धिबळ गायन वक्तृत्व सामान्य ज्ञान निबंध वेशभूषा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत चित्रकला स्पर्धेसाठी दिवसभरात सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता याप्रसंगी श्री संत नामदेव समाजसेवा मंडळ श्री संत नामदेव युवक संघटना नामदेव महिला मंडळ यांचे सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.