अनेकवेळा लोक हे एलपीजी खरेदी करताना फेक आयडीवर खरेदी करतात. परंतु आता फेक आयडी वर LPG घेणे कठीण होणार आहे. कारण एलपीजी आता आधार कार्डशी लिंक होणार आहे. कारण आता तेल विपणन कंपन्या LPG ग्राहकांच्या ओळखीसाठी आधार आधारित ई-केवायसी सुरू करत आहे. यासंबंधीत माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेली आहे. त्यामुळे ग्राहक आता त्यांच्या वितरकांशी संपर्क साधून त्यांच्या सोयीनुसार हे केवायसी पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी किंवा सरकारने कोणतीही अंतिम मुदत अजून निश्चित केलेली नाही.
याची गरज का होती? | Aadhaar-based eKYC for LPG
तेल विपणन कंपन्यांना आधार-आधारित ई-केवायसी आवश्यक आहे. कारण असे बरेच लोक आहेत जे निवासी नावाने एलपीजी खरेदी करतात. परंतु व्यावसायिक कारणांसाठी वापरतात. घरगुती एलपीजी सिलिंडर स्वस्तात मिळतात तर व्यावसायिक सिलिंडर महाग असतात. उदाहरणार्थ, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1646 रुपये असेल, तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये असेल. आता ई-केवायसीच्या माध्यमातून सरकारला हे थांबवायचे आहे आणि सबसिडी योग्य लोकांपर्यंत जाईल.
eKYC कसे केले जाईल?
ई-केवायसी तीन प्रकारे करता येते. जवळच्या एलपीजी वितरकाच्या शोरूममध्ये जा. जेव्हा दुसरा गॅस डिलिव्हरी करणारी व्यक्ती सिलिंडरची डिलिव्हरी करेल तेव्हा तो मोबाइल ॲपद्वारे करेल. तिसरे, तेल कंपन्यांच्या मोबाईल ॲप्सद्वारे eKYC सहज करता येते. भारत, इंडेन आणि एचपीसाठी ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध असतील.
मोबाईल ॲपद्वारे eKYC कसे करावे ?
आधार मोबाइलशी लिंक आहे आणि LPG खाते सक्रिय असल्याची खात्री करा. त्यानंतर तुमच्या एलपीजी प्रदात्याच्या साइटवर जा. येथे, eKYC पर्याय निवडा आणि आवश्यक तपशील जसे की LPG ग्राहक क्रमांक आणि आधार क्रमांक भरा. OTP येईल, तो भरा. त्यानंतर हा डेटा तेल विपणन कंपन्यांद्वारे प्रमाणित केला जाईल आणि सत्यापन पूर्ण झाल्यानंतर, एक संदेश येईल.