Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगशेअर मार्केटमध्ये आलंय तुफान, आता 2 ऑगस्टला काय होईल?

शेअर मार्केटमध्ये आलंय तुफान, आता 2 ऑगस्टला काय होईल?

निफ्टी 59.70 अंक म्हणजेच 0.24 टक्के वाढून 25,010.90वर बंद झाला. आज 1237 शेअर्समध्ये तेजी आली, 2181 शेअर्समध्ये घसरण झाली, तर 78 शेअर्समध्ये काहीही बदल झाला नाही. कोल इंडिया, पॉवर ग्रिड कॉर्प, श्रीराम फायनान्स, डॉ. रेड्डीज लॅब्ज, ओएनजीसी हे शेअर्स निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये होते. एम अँड एम, हीरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि एसबीआय या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली.

 

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं, तर ऑटो, कॅपिटल गुड्स, आयटी, मीडिया, टेलिकॉम, पीएसयू बँक आणि रियल्टीमध्ये 0.5-2 टक्के घसरण नोंदवली गेली. मेटल, ऑइल अँड गॅस, पॉवर आणि ऊर्जा क्षेत्रात खरेदी पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये एक टक्क्याची घसरण नोंदवली गेली.

 

2 ऑगस्टला कशी असेल दिशा?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितलं, की भारतीय शेअर बाजारांनी ऑगस्ट महिन्याची सुरुवात 25,000च्या मनोवैज्ञानिक पातळीच्या वर जाऊन मजबुतीसह केली; मात्र आरएसआयमध्ये निगेटिव्ह डायव्हर्जन्समुळे इंडेक्सवर वरून दबाव आला आणि तो 59.75 अंकांच्या वाढीसह 25,010.90च्या पातळीवर बंद झाला. एनर्जी इंडेक्समध्ये आज सर्वाधिक तेजी राहिली. मीडिया, रियल्टीमध्ये सर्वाधिक घसरण राहिली. ब्रॉडर मार्केटने फ्रंटलाइन इंडेक्सपेक्षा कमजोर कामगिरी केली. मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.85 टक्के आणि 0.98 टक्के घसरण झाली.

 

निफ्टीने एक स्पिनिंग टॉप कँडलस्टिक पॅटर्न बनवला आहे. तो अनिर्णित स्थिती दर्शवतो. निफ्टीसाठी खालच्या बाजूला 24,930च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे. वरच्या बाजूला 25,100च्या जवळ त्याला तात्काळ रेझिस्टन्स दिसत आहे.

 

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विनोद नायर यांचं म्हणणं आहे, की महागाईच्या दबावात घट झाल्याने सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कमी करण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे ग्लोबल बाजारात तेजी आली. त्याचा परिणाम भारतावरही पाहायला मिळाला. त्यामुळे आज बेंचमार्क इंडेक्समध्ये सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. मध्य-पूर्वेत वाढत असलेल्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्स नकारात्मक कलासह बंद झाले. सेक्टोरल इंडेक्समध्ये कॅपिटल गुड्स आणि रियल्टीमध्ये नफावसुलीसह ऑटो सेक्टरवरही दबाव पाहायला मिळाला. मासिक ऑटो विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आहेत. त्याचा परिणाम ऑटो शेअर्सवर दिसला.

 

शेअरखानच्या जतिन गेडिया यांचं म्हणणं आहे, की निफ्टी आज तेजीसह उघडला आणि दिवसभर कन्सॉलिडेट होत राहिला. 60 अंकांच्या तेजीसह बंद झाला. डेली चार्टवर निफ्टी वरच्या बाजूला साइडवेज कन्सॉलिडेशनच्या बाहेर पडला आहे. हा ब्रेकआउट एका अल्प विरामानंतर पुन्हा वरच्या बाजूला वाढण्याचे संकेत देत आहे. अशी अपेक्षा आहे, की शॉर्ट टर्ममध्ये ही वाढ 25,330-25,530च्या दिशेने चालू राहील. निफ्टीसाठी आता 24,850-24,800वर सपोर्ट दिसत आहे. डेली आणि ओव्हरली इंडिकेटरच्या दरम्यान डायव्हर्जन्स एका कन्सॉलिडेशनकडे घेऊन जाऊ शकतो. आम्ही प्राइस अॅक्शनला जास्त महत्त्व देऊ आणि निफ्टीवर सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवू.

 

बँक निफ्टीमध्ये आज रेंजबाउंड प्राइस अॅक्शन पाहायला मिळाली. कन्सॉलिडेशनने एक सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्नचं रूप घेतलं आहे. आता एक रेंज ब्रेकआउट पुढचा कल ठरवील. बँक निफ्टी पुढेही रेंजबाउंड राहण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी कन्सॉलिडेशनची रेंज 51,300-52,000 राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -