निपाणी – तालुक्यातील बेडकिहाळ येथील पाटील मळ्यात उषाराणी हा मनाचा हत्ती गेल्या अनेक वर्षा पासून
वास्तव्यास होता. जैन धर्मातील अतिशय तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र कोथळी कुप्पानवाडी ट्रस्टचा हा उषाराणी हत्ती वय 52, या हत्तीचे आज शनिवार तारीख 10 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. आचार्यरत्न देशभुषण महाराज यांनी कोथळी कुप्पानवाडी ट्रस्ट साठी त्या वेळी हत्तीचे पिल्लू आणले होते. बेडकिहाळ येथील पाटील यांच्या मळ्यातील खास करून बनविण्यात आलेल्या हत्तीचे वास्तव्य गृहातच राहत असे,त्यामुळे बेडकिहाळ व परिसरातील नागरिकांना त्याचा विशेष लळा लागला होता.
उषाराणीच्या निधनाची बातमी कळताच बेडकिहाळ,
शमनेवाडी, चाँदशिरदवाड, बोरगाव व कोथळी कुप्पानवाडी परिसरातील नागरिक तसेच महिला उषाराणीचे अंत्य दर्शन घेण्यासाठी गर्दी केले होते. तर या वेळी बऱ्याचजनाना अश्रु अनावर झाले. या वेळी नांदणी मठाचे प. पू. जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महा स्वामीजी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिले, त्याच बरोबर उपस्थितानी उषाराणी च्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. माहूत बासू लक्ष्मीश्वर हे करत होते. उषाराणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाली होती, तर बेडकिहाळ चे ग्राम दैवत श्री सिद्धेश्वरांच्या वर्षातून होत असलेल्या तिन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालकिस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे.