बटाट्याची भाजी ही कोणत्याही खास प्रसंगासाठी किंवा रोजच्या जेवणासाठीसुद्धा उत्तम ऑपश्न आहे. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत श्रावणात नैवेद्याला करण्यासाठी खास नैवेद्याची बटाटा भाजी.भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.
नैवेद्याची बटाटा भाजी साहित्य
६ बटाटे उकडलेले१ टेबलस्पून तेलटेबलस्पून कोथिंबीर धुवून बारीक कापलेलीहिरवं तिखटचवीनुसार मीठ, पाव चमचा साखर१० कढीपत्त्याची पाने१/४ चमचा हळद अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग
नैवेद्याची बटाटा भाजी कृती
१. सर्वप्रथम बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी कराव्यात. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे, तेल गरम झालं की हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता यांची खमंग फोडणी करून त्यामध्ये हळद घालावी आणि बटाट्याच्या फोडी टाकून छान परतावे.
२. त्यामध्ये हिरवं तिखट, चिरलेली कोथिंबीर, साखर, मीठ, घालून छान परतावे व दोन मिनिटं मंद गॅसवर ठेवून मध्ये मध्ये परतत राहावे.
३. हिरवं तिखट घातल्याने मिरची तोंडात येत नाही व भाजीची चव ही अप्रतिम लागते. भाजी छान मंद गॅसवर फ्राय केल्याने ती खूप खमंग होते.