Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी धान्यओळ परिसरातील ट्रॅफिक जाम समस्या गंभीर प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीची मागणी

इचलकरंजी धान्यओळ परिसरातील ट्रॅफिक जाम समस्या गंभीर प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीची मागणी

शहरातील धान्यओळ, PNG ज्वेलर्स, पालणकर ज्वेलर्स, आणि सुंदर (demand management)

बागेकडून येणाऱ्या चौकातील ट्रॅफिक जामची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या चौकातून जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी, हा परिसर रहदारीसाठी अत्यंत धोकादायक ठरला आहे.

 

धान्यओळ या परिसरात धान्याच्या ट्रक गाड्या दिवसा मोठ्या प्रमाणावर येतात. या गाड्या रोडवरच धान्य खाली करत असल्याने त्या तासंतास रस्त्यावरच उभ्या राहतात. (demand management)त्यामुळे या परिसरात सतत ट्रॅफिक जाम होत आहे. हे जाम झालेलं ट्रॅफिक चारही बाजूंनी वाढत जातं आणि त्याचा परिणाम पुढील रस्त्यांवरही होत आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत.

 

 

स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अनेकदा प्रशासन आणि ट्रॅफिक पोलिसांना या समस्येबाबत सूचित केले आहे. परंतु, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या समस्येमुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना आणि रहिवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मागणीनुसार, (demand management)प्रशासनाने या परिसरातील ट्रॅफिक नियंत्रणासाठी योग्य ती पावले उचलावीत. विशेषतः, धान्याच्या ट्रक गाड्यांसाठी विशिष्ट वेळ निश्चित केली जावी, ज्यामुळे रहदारीचा त्रास कमी होऊ शकेल.

 

 

शहरातील रहिवाशांनी या समस्येचा त्वरित निपटारा करण्यासाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. जर लवकरच उपाययोजना केली गेली नाही, तर यामुळे निर्माण होणारे अडचणींचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -