प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. पीएफ अकाउंटमध्ये कंपनी आणि कर्मचारी दर महिन्याला काही ठरावीक रक्कम जमा करतात. ही रक्कम कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळते. परंतु तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर तुम्ही हे पैसे काढू शकतात.
पीएफ अकाउंटमधून तुम्ही लग्नासाठी, आरोग्याच्या समस्येसाठी पैसे काढू शकतात. पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते.परंतु आता पीएफ अकाउंटमधून पैसे काढणे सोयीचे होते. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पैसे काढू शकतात.
पीएफ अकाउंटमधून ऑनलाइन पैसे कसे काढायचे
सर्वप्रथम तुम्ही तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिव्हेट करुन घ्या. हा नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असावे. यामुळे तुमची ओळख पटणे सोपे होणार आहे.
यानंतर तुम्हाला ईपीएफओ पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे.https://www.epfindia.gov.in या साइटवर जाऊन तुम्ही यूएन आणि पासवर्ड टाका. यानंतर तुम्हाला युएन अॅक्टिव्हेट करण्याचा ऑप्शन येईल.
यानंतर तुम्हाला Online Sevices या टॅबरवर क्लिक करा.यानंतर Claim (Form-31,19,10C & 10D)यावर क्लिक करा. यानंतर PF Withdrawl या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल. यानंतर नाव, जन्मतारीख, बँक अकाउंटची माहिती भरा.
यानंतर I Want To Apply या सेक्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुम्हाला पैसे काढण्याचे कारण टाकायचे आहे.
जर तुम्हाला पूर्ण पीएफचे पैसे काढायचे असेल तर PF Final Settlement (Form 19) यावर क्लिक करा. जर तुम्हाला PF Advance काढायचा असेल तर (Form 31) वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला पैसे का काढायचे आहे याचे योग्य कारण टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
यानंतर तुम्हाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर पुढे प्रोसेस होईल.
यानंतर तुमच्या क्लेमची प्रोसेस सुरु होईल. अर्ज केल्यापासून १०-१५ दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे मिळतील.