Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात बस नदीत कोसळली आहे. महाराष्ट्रातील प्रवासीसुद्धा या बसमध्ये होते. ही बस मर्स्यांगडी नदीत पडली आहे. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. उत्तर प्रदेशातील ही बस नदीत पडली. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

नेपाळ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय प्रवासी घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. बसमध्ये 40 प्रवासी होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे. मात्र 14 जणांचा मृत्यू झाला आहे. केसरवानी ट्रॅव्हल्सची ही बस (UP 53 FT 7623) गोरखपूरहून नेपाळला गेली होती. बस पोखराहून काठमांडूला जात होती. त्यावेळी मर्स्यांगडी नदीत बस पडली. शुक्रवारी 11.30 वाजात ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु त्यात काही महाराष्ट्रातील प्रवाशी आहेत. सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

 

बस नदीत कशी पडली?

बस अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवले. बस नदीत कशी पडली? त्याचा कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून मदतकार्याला प्राधान्य दिले आहे.

 

मागील महिन्यांत अपघात

गेल्या महिन्यात जुलै महिन्यात नेपाळमध्येही मोठी दुर्घटना घडली होती. येथे दरड कोसळल्यानंतर दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या अपघातात सात भारतीयांचा मृत्यू झाला होता. तर बसमधील सुमारे 62 प्रवासी बेपत्ता झाले होते. त्यापैकी काहींचे मृतदेह नंतर सापडले आणि काहींची सुटका करण्यात आली.

 

2021 मध्ये 32 जणांचा मृत्यू

2021 मध्येही नेपाळमध्ये एक भीषण अपघात झाला होता. त्यानंतर नेपाळमधील मुगु जिल्ह्यातील गमगडी येथे जाणारी एक प्रवासी बस रस्त्यावरून घसरली आणि 300 मीटर खाली नदीत पडली. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नेपाळगंजहून गमगडीकडे जाणारी ही बस पिना झयारी नदीत पडली होती. छायानाथ रारा महापालिका हद्दीत हा अपघात झाला. बसमधील बहुतांश प्रवासी दुर्गापूजेनिमित्त विविध ठिकाणांहून आपापल्या घरी परतत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -