इचलकरंजी
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत झालीच पाहिजे, या मागणीसाठी बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुतळ्यानजीक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या धरणे आंदोलनामध्ये शहरातील सर्व नागरिक बंधु भगिनीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे” असे जाहीर आवाहन कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






