बजाज उद्योग समुहाच्या बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार उत्साह दाखवला. तीन दिवसात गुंतवणूकदारांनी विक्रमी बोली लावली. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओनं शेअर बाजारातील आयपीओचे सर्व विक्रम मोडले. टाटा उद्योग समुहाच्या टाटा टेक्नोलॉजीच्याच्या आयपीओच्या नावावर असलेला सर्वाधिक बोलीचा विक्रम आता बजाज हाऊसिंग फायनान्सच्या नावावर झाला आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओवर तीन दिवसात साडे चार लाख कोटी रुपयांची बोली लागली. टाटा टेक्नोलॉजीच्या नावावर यापूर्वी हा विक्रम होता. त्यांच्या आयपीओवर 1.5 लाख कोटी रुपयांची बोली लागली होती.
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या व्यवस्थापनानं आयपीओद्वारे 6560 कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न केला होता. या आयपीओद्वारे 3560 कोटींचे नवे शेअर इशू करण्यात आले आहेत. तर, 3 हजार कोटी रुपयांची ऑफर सेल करण्यात आली होती. चित्तोडगढ डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार बुधवारी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ 67.43 पट सबस्क्राईब झालं आहे. म्हणजेच 6560 कोटी रुपयांच्या इशूसाठी गुंतवणूकदारांनी 4.42 लाख कोटी रुपयांची बोली लावली आहे.
क्वालिफायईड इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार म्हणजे मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून देखील विक्रमी बोली लावण्यात आली आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ 9 सप्टेंबरला खुला झाला होता तो 11 सप्टेंबरला बंद झाला. बाजारात या कंपनीच्या शेअरचं लिस्टींग 16 सप्टेंबरला होणार आहे. बजाजतर्फे आयपीओत कंपनीच्या शेअरची किंमत 66-70 रुपये ठेवली होती. एका लॉटमध्ये 212 शेअर होते. आयपीओवर क्यूआयबी प्रवर्गातील गुंतवणूकदारांनी सर्वाधिक बोली लावली. क्यूआयबी कडून 222.05 पट बोली लावली गेली. तर, एनआयआयनं 43.98 पट बोली लावली, रिटेलर्सननी 7.41 पट आणि कर्मचाऱ्यांनी 2.13 पट तर इतर गुंतवणूकदारांनी 18.54 पट बोली लावली.
ग्रे मार्केटमध्ये बोलबाला
बजाज हाऊसिंग फायनान्स ही गृहकर्ज देणीर संस्था आहे. ही 2015 पासून नॅशनल हाउसिंग बँकेकडे नोंदणीकृत आहे. आयपीओमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, बोफा सिक्यूरिटीज, एक्सिस कॅपिटल, गोल्डमॅन सॅश (इंडिया) सिक्यूरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, जेएम फायनान्शियल आणि आयआयएफएल सिक्यूरिटीजला आयपीओचं बुक रनिंग लीड मॅनेजर केलं गेलं होतं. हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 96 टक्के अधिक ट्रेड करत होता.बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची सोशल मीडियावर देखील चर्चा सुरु आहे.