राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. अनेक योजनांचा लाभ नागरिकांनी घेतलेला आहे. परंतु सध्या सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana) खूप चर्चेत आहे. जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे देखील का अनेक महिलांना मिळालेले आहेत. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारने 1 कोटी 59 लाख महिलांना या योजनेचे दोन हप्ते दिलेले आहेत. राज्यातील महिलांचा विचार करता त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी सरकारने ही योजना खास महिलांसाठी चालू केलेली आहे. परंतु काही लोक या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न देखील करत आहे.
नवी मुंबईमध्ये या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये महिलाच्या नावावर महिलां आधार क्रमांकाचा वापर करून एका पुरुषाने पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज दाखल केलेले होते. अशातच आता छत्रपती संभाजी नगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आलेला आहे. कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून अर्ज भरल्याची घटना समोर आलेली आहे. आणि याबाबत कारवाई देखील करण्यात आलेली आहे.
पुरुष घेतायेत योजनेचा गैरफायदा
सरकारच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील 12 पुरुषांनी महिलेचे फोटो लावून स्वतःचा अर्ज भरलेला आहे. परंतु ही बाब महिला आणि बालकल्याण विभागाच्या लक्षात आली आणि या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. या तालुक्यातील जवळपास 12 असे अर्ज आले होते, त्यानंतर ते अर्ज रिजेक्ट देखील करण्यात आले आहेत. यात आधार कार्ड महिलांचे आणि नाव पुरुषाचं होतं.
अनेक महाराष्ट्रातील महिलांनी अजूनही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेला नाही. त्यासाठी राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढ करून ती 30 सप्टेंबर ही केलेली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 एवढ्या अर्ज भरण्यात आलेले आहेत. त्यातील 90957 अर्ज मंजूर झालेले आहे. तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे 428 अर्ज अपात्र ठरलेले आहे. तर 357 अर्ज रद्द झालेली आहे.
अर्जांची तपासणी करताना कन्नड तालुक्यामध्ये हा प्रकार समोर आलेला आहे. 12 जणांनी स्वतःच्या नावाने पोर्टलवर अर्ज अपलोड केलेले आहेत. तसेच आधार कार्ड ही स्वतःच्याच नावाचे केलेले आहेत. हमीपत्र स्वतःच्या नावाने भरून दिलेला आहे. परंतु पोर्टलवर महिलेचा फोटो अपलोड केलेला आहे. या आधीच अजित पवार यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्री बालाजी लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेतला, तर त्यावर कारवाई देखील करण्यात येईल. आणि आता कन्नड तालुक्यातील या 12 पुरुषांवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आलेली आहे.