Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्र‘मुंबईचा राजा’ गणेशगल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक

‘मुंबईचा राजा’ गणेशगल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक

दहा दिवसांच्या पूजा आणि सेवेनंतर आता अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे.

 

घराघरात आणि सार्वजनिक मंडळात विराजमान झालेले गणराय आता भक्तांचा निरोप घेत आहेत.

 

लालबाग परळ परिसरात विविध गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघत आहेत.

 

मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात निघाली आहे.

 

यंदा गणेशगल्लीच्या गणपतीला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

 

विसर्जनाच्या मिरवणुकीने लालबाग-परळ परिसर गजबजून गेला आहे.

 

मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीची मूर्ती मंडपातून बाहेर आली आहे. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

 

मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष भक्तांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -