आज १९ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच गुरुवारी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत वृद्धी योग जुळून येईल. तसेच आज उत्तरा भाद्रपद नक्षत्र सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे, त्यानंतर रेवती नक्षत्र दिसेल. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजपर्यंत असेल. कृष्ण पक्षाच्या द्वितीय तिथीला श्राद्ध केलं जातं असं म्हणतात. तर आजचा दिवस १२ राशींसाठी कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊ या…
१९ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :
मेष:- मनाची चंचलता जाणवेल. अती विचार करू नका. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा. कार्यक्षेत्रात मान मिळवाल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल.
वृषभ:- कामे मनाप्रमाणे मार्गी लावाल. जमिनीचे व्यवहार कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा. अधिकारी वर्ग सकारात्मक बातमी देतील.
मिथुन:- इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल. नवीन कामे हाती येतील. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद संभवतात. बौद्धिक कसोटी लागू शकते.
कर्क:- लहान प्रवास कराल. वडीलधार्यांना विरोध करू नका. जुने ठरवलेली कामे पूर्ण कराल. विरोधकांच्या कारवाया मावळतील. हस्तकलेत चिकाटी बाळगा.