Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रनवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

गेल्या महिनाभरापासून ज्या चित्रपटाची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती तो अखेर रिलीज झाला. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूम धडाक्यामध्ये स्वागत करण्यात आलं.

संपूर्ण कुटुंब हा चित्रपट बघायला जात असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अशातच हा चित्रपट नक्की कसा आहे? याची उत्सुकता प्रत्येकाला आहेच.

चित्रपटाची उजवी बाजू किंबहुना चित्रपट का बघावा तर यामध्ये केलेल्या अभिनयामुळे. सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, सुप्रिया पिळगावकर यांच्यासारखे सुपरस्टार. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासारखा दिग्गज नट. सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, हरीश दुधाडे यांच्यासारखे आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देणारे अभिनेते यांच्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल यात काहीच वाद नाही.

तर दुसरीकडे नवरा माझा नवसाचा प्रमाणेच नवरा माझा नवसाचा दोन मध्येही एका नवसाची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा हा प्रवास एसटी मधून नाहीये. तर तो प्रवास आहे कोकण रेल्वेमधून. सर्वसामान्य कोणणी माणसासाठी कोकण रेल्वे हा जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेमधून प्रवास करताना येणारी मज्जा. तो नोस्टेलच्या आपल्याला या चित्रपटामध्ये प्रवासादरम्यान पाहायला मिळतो. वेळोवेळी कोणतं ना कोणतं छोटा का होईना पात्र येतं आणि आपली छाप सोडून जातं.

तर दुसरीकडे नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट पाहायला गेलो तर हा एक सुंदर कॉमेडी कौटुंबिक चित्रपट आहे. कोणत्याही साधारण मराठी व्यक्तीला ज्या प्रकारचा चित्रपट अपेक्षित असतो, ज्या प्रकारची कॉमेडी अपेक्षित असते त्या प्रकारचीच कॉमेडी यात करण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंब जाऊन हा चित्रपट बघू शकतो. या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -