Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रबिग बॉस मराठी’ फेम इरिना रूडाकोवा झळकणार मराठी मालिकेत

बिग बॉस मराठी’ फेम इरिना रूडाकोवा झळकणार मराठी मालिकेत

बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतोय. यंदाच्या सिझनमध्ये परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा हिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस मराठी’फेम इरिना रूडाकोवा हिने मराठी संस्कृती आपलीशी केली आहे, हे प्रेक्षकांना भावतं. आता इरिना रूडाकोवा ही मराठी मालिकेत दिसणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या मालिकेत झळकणार आहे.

इंदू आणि इरिना रूडाकोवाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलेत. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. यात ‘बिग बॉस मराठी’ फेम इरिना रूडाकोवाची ‘इंद्रायणी’ मालिकेत एन्ट्री झाल्याचं दिसत आहे.

 

इरिना झळकणार मराठी मालिकेत

‘इंद्रायणी’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये विठूच्या वाडीत आलेली फॉरेनर आल्याचं दिसून येत आहे. तिचं परीसारखं रूप, सोनेरी केस अशा सर्वच गोष्टींची विठूच्या वाडीला भूरळ पडलेली पाहायला मिळत आहे. ही परी दुसरीतिसरी कोणी नसून ‘बिग बॉस मराठी’ फेम इरिना रूडाकोवा आहे. इरिनाच्या येण्याने ‘इंद्रायणी’ मालिकेत काय गमतीजमती घडतात? तिची डॉक्यूमेंट्री पूर्ण होणार की नाही? इंदू आणि इरिनाची मैत्री होणार का? तसेच इरिना कीर्तनही शिकणार का? या सर्व गोष्टी ‘इंद्रायणी’ मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

 

इरिनाने सांगितला अनुभव

‘इंद्रायणी’ या मालिकेबद्दल बोलताना इरिना रूडाकोवा हिने तिची प्रतिक्रिया दिली आहे. मालिकेसाठी खूप उत्सुक असल्याचं तिने सांगितलं. इंद्रायणी’ ही मालिका माझ्यासाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. मालिकेतील माझं पात्र खूप गोड आणि सकारात्मक आहे. त्यामुळेच हे पात्र मला खूप भावलं. सेटवरील सगळ्यांसोबत काम करताना मजा येतेय. मजा करण्यासह इथला प्रत्येक जण खूप मेहनतीने काम करत आहे, असं इरिना म्हणाली.

 

मालिकेतील ‘इंद्रायणी’ म्हणजेच सांची भोईर खूपच गोड आहे. तिच्यासोबत काम करतानाचा अनुभवदेखील खूप कमाल आहे. तिच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ‘इंद्रायणी’ ही मालिका आता माझ्या खूप जवळची झाली आहे. सेटवर मिळणारं प्रेम आणखी छान काम करण्याचं प्रोत्साहन देत आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबियांसोबत दररोज ‘इंद्रायणी’ मालिका नक्की पाहावी, असं इरिनाने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -