राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेले आहेत येत्या 20 नोव्हेंबर रोजी यांनी निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांची राजकारण करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांना वेग आलेला आहे. या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. परंतु पोलिसांच्या कामात मात्र वाढ होणार आहे. कारण आता मुंबई सह राज्यात पोलीस दलात असलेल्या पोलिसांची आठवड्याची सुट्टी तसेच इतर रजा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने गुरुवारी एक परिपत्रक जारी केलेले आहे. आणि त्यात या गोष्टी सांगितलेल्या आहे. या रजा बंदीमधून वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणांच्या रजा वगळण्यात आलेल्या आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत काही अनुचित घटना घडू नये. तसेच सतर्कतेचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आलेले आहेत. आणि त्याच कारणाने सगळ्या सुट्ट्या पोलिसांचा रद्द करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त करण्यासाठी हे आदेश पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक आणि अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
याच कारणामुळे निवडणूक पार पडेपर्यंत पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सुट्ट्यांशिवाय कोणत्याही सुट्ट्या घेणार नाही. असा आदेश पोलिसांना देण्यात आलेला आहे. मतदान सभेच्या निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांकडे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. याबाबतची बैठक देखील घेण्यात आलेली आहे. यावेळी मुंबई शहर आणि उपनगरात एकूण पेक्षा जास्त मतदार आहे. ज्या नागरिकांची अजूनही मतदार नोंदणी झालेली नाही. त्यांना नोंदणीत दुरुस्ती बाकी आहे. त्यांना 19 ऑक्टोबर पर्यंत मुदत असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. यावर्षी महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणुका होत आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर होणार आहे.