Saturday, December 21, 2024
Homeकोल्हापूरजिल्ह्यात १४ नवे बाधितसक्रीय रुग्ण संख्या गेली ६२ वर(इचलकरंजीत तीन रूग्णांची भर)

जिल्ह्यात १४ नवे बाधितसक्रीय रुग्ण संख्या गेली ६२ वर(इचलकरंजीत तीन रूग्णांची भर)

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर, बुधवारी दिवसभरात कोरोनाचे १४ नवे बाधित सण आढळून आले तर केवळ एक जण कोरोनामुक्त झाला, त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय कोरोना रुग्ण संख्या ६२ वर गेली आहे. मात्र मृत्यूंची संख्या शुन्य आहे.

बुधवारी दिवसभरात आढळून आलेल्या १४ कोरोना बाधितामध्ये केवळ कोल्हापूर महानगरपालीका क्षेत्रातील तब्बल ९ जणांचा समावेश असल्याने कोल्हापूर शहरवासीयांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब मानावी लागेल, याबरोबरच उर्वरित कोरोना बाधितामध्ये करवीर तालुक्यातील दोन जण तर इचलकरंजी नगरपरिषदेमधील ३ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ८२३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ९६३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९८ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ६२ इतकी आहे.

इचलकरंजीत तीन रूग्णांची भर गेल्या काही दिवसांपासून कोरोनापासून वखनगरीला दिलासा दिला होता. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार दाते मळा भागातील विनायक चेंबर परिसरात ३ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इचलकरंजी शहरात आज अखेर रुग्णांची संख्या १६०० वर जाऊन पोहचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -