इचलकरंजी विधानसभा मतदार संघात २९ ऑक्टोबरपर्यंत मतदार संख्या ३ लाख १२ हजार ६६४ झाली आहे. यामध्ये १ लाख ५८ हजार ७२९ पुरुष, तर १ लाख ५३ हजार ८८९ स्त्री आणि ६२ इतर मतदार आहेत. मतदारसंघात २६६ मतदान केंद्रे तसेच २ सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण २६८ मतदान केंद्रे आहेत. त्याचबरोबर २१ विविध ठिकाणच्या इमारती मध्ये ५ किंवा ५ हून अधिक मतदान केंद्रे आहेत.
इचलकरंजी मतदार संघातील मतदारांना केंद्र निहाय २४ पर्यवेक्षक, २६८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच महापालिका कर विभागाकडील ४८ कर्मचारी अशा एकुण ३४० कर्मचाऱ्यांच्या मार्फत ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप होणार आहे.
या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी,कर्मचारी यांची बैठक घ ेऊन सहा निवडणुक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी इचलकरंजी मतदारसंघांत मतदार चिठ्ठी वाटपाचे काम १०० टक्के करण्याचे आवाहन केले.
इचलकरंजी मतदार संघांत नियुक्त केलेल्या एकुण १२८० अधिकारी, कर्मचारी यांचे दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन ९ आणि १० नोव्हेंबर रोजी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे केले आहे.
याचठिकाणी सदर नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इचलकरंजी मतदार संघात सुमारे १२५० ट पाली मतपत्रिकेद्वारे टपाली
मतदान होणार आहे. सैन्य दलातील १५९ मतदार तर इचलकरंजी मतदार संघात असलेले परंतु याच मतदार संघात निवडणूक कर्तव्यावर असलेले सुमारे ५०० मतदार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिली.