Thursday, November 14, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी: जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

इचलकरंजी: जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

रुकडी (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीला मोटार सायकल वरून शेतात नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी अक्षय गौतम जाधव (वय २९ रा. हेरले) याच्या विरोधात शुक्रवारी हातकणंगले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक आत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद अत्याचारीत मुलीच्या आईने दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, संबंधीत महिलेची मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती अक्षय जाधव वाला असताना सुद्धा त्याने पीडित मुलीस रुकडी येथून अतिग्रे फाट्यावर बोलावून घेतले व हालोंडी हेर्ले गावा दरम्यान असलेल्या शेतात स्वतःच्या मोटारसायकलवरून नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हि घटना 1 सहा नोव्हेबरला रात्री साडे सहा ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईस मिळाल्याने तिने आज हातकणंगले पोलीसात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. एस. एस. पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -