Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रBigg Boss 18: आरफीन खान बिगबॉसच्या घरातून बाहेर, पत्नी सारा रडली पडली,...

Bigg Boss 18: आरफीन खान बिगबॉसच्या घरातून बाहेर, पत्नी सारा रडली पडली, अविनाशचे पाय धरून मागितली माफी!

बिगबॉसच्या घरात विकेंड का वार म्हणजे नॉमिनेट झालेल्या स्पर्धकाच्या हाकलपट्टीचा दिवस. शनिवारच्या एपिसोडमध्ये बिगबॉसच्या घरातून आरफीन खानला बिगबॉसच्या घरातून निरोप देण्यात आला.

 

 

सगळ्यात कमी मतं मिळाल्यानं माइंड कोच बिगबॉसच्या घरातून बाहेर पडला. बिगबॉसच्या घरात आरफीन आणि त्याची पत्नी सारा खान या दोघांनी एकत्र प्रवेश केला होता.आरफीन घराबाहेर पडण्यासाठी पुढे जाताच सारा रडून गोंधळ घातल्याचं दिसलं.

 

आरफीनच्या एव्हिक्शननं साराचा संयम संपतो आणि ती रडत राहते. आरफीनला जाताना मिठी मारत तिनं निरोप दिल्याचं दिसलं. नंतर तिनं रडत गोंधळ घालत अविनाशची पाय धरत माफी मागितल्याचं दिसलं. आरफीनचा निरोप आणि साराच्या वागण्याच्या नाट्यपूर्ण घटनांनी बिगबॉसच्या घरात काहीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर सध्या घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

 

अविनाशचे धरले पाय!

 

आरफीनच्या एलिमिनेशननंतर घरातील स्पर्धकांचे संघर्ष टोकाला जाताना दिसत आहेत. प्रत्येकजण अधिक आक्रमकपणे गेम खेळताना दिसत आहे.बिग बॉस 18 च्या एका अलीकडील एपिसोडमध्ये, स्पर्धक आरफीन खानचे एलिमिनेशन झाले, ज्यामुळे मोठा नाट्यमय प्रसंग निर्माण झाला. आरफीनची पत्नी, सारा खान, या घटनेने खूप भावूक झाली आणि तिने सहकारी स्पर्धक अविनाश मिश्रा याच्याकडे माफी मागितली. ती इतकी भावनिक झाली होती की तिने अविनाशचे पायही धरले. या घटनेचे कारण म्हणजे शोदरम्यान एका टास्कमध्ये साराने संतापाच्या भरात अविनाशवर वस्तू फेकल्याचं दिसलं होती. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होत.

 

आरफीन जाताना झाली भावूक

 

सोशल मीडियावर नुकताच या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. आरफीन खानला बिगबॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याची पत्नी साराला त्याचा मोठा धक्का बसल्याचे दिसले. त्याला मिठी मारत ती भावूक झाल्याचेही दिसले.

 

रोहित शेट्टीनंही साराच्या वागण्याला फटकारलं

 

आरफीनच्या घरातील निरोपामुळे निराशेतून सारा, अविनाश मिश्रा, इशा सिंग आणि ॲलिस कौशिक यांच्याकडे ती वळते आणि त्यांची क्षमा मागते. नुकत्याच तिच्या झालेल्या उद्रेकाने रोहित शेट्टीने साराच्या वागण्यातली खोट काढली. तिने साराला मुलींबद्दल चुकीची कमेंट केल्याबद्दल आणि अविनाश आणि त्यांच्या नात्याची खिल्ली उडवल्याबद्दल त्याची माफी मागायला सांगितली. आरफीन घरातून बाहेर पडत असताना सारा ईशा आणि अविनाशच्या पाया पडून त्यांची माफी मागताना दिसी. तिच्या वागण्याचा घरच्या सदस्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -