गेल्या एका महिन्यापासून शेअर बाजारात घसरण चालू आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 0.29 टक्क्यांनी तर निफ्टीमध्ये 0.64 टक्क्यांनी घसरण झाली. भविष्यातही शेअर बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसेसनने आगामी सात दिवसांत चांगला परतावा देण्याची शक्यता असलेले सर्वोत्तम 5 शेअर्स सूचवले आहेत.
रेलिगेयर ब्रोकिंग या ब्रोकरेज हाऊसने Jubilant FoodWorks या शेअरध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 339 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 305 ठेवावे, असे या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. पाच ते सात दिवसांसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल, असं या ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
रेलिगेयर ब्रोकिंगने सिव्हिल कंस्ट्रक्शन कंपनी NCC या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईस 628 रुपये प्रति शेअर तर 593 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा, असं रेलिगेयरनं म्हटलंय. 1 ते 3 दिवसांची ही गुंतवणूक करावी, असं ब्रोकरेज फर्मने सूचवलं आहे.
पीएल टेक्निकल रिसर्चने हॉटेल्स अँड रिसॉर्ट क्षेत्रात काम करणारी Lemon Tree Hotels या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईस 130 रुपये प्रति शेअर आणि स्टॉप लॉस 118 रुपये प्रति शेअर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
IDBI Capital या ब्रोकरेज फर्मने लाईफ इन्शुरन्स कंपनी HDFC LIFE या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईस 738 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 707 रुपये प्रति शेअर असं ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांसाठी हा शेअर खरेदी करावा असं IDBI Capital ने म्हटलं आहे.
IDBI Capital या ब्रोकरेज फर्मने CDSL या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 1,706 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 1,595 रुपये ठेवायला हवा असं या ब्रोकरेज फर्मने म्हटलंय. आगामी दोन ते तीन दिवसांसाठी या कंपनीत गुंतवणूक करावी, असं या ब्रोकरेज फर्मने सूचवलं आहे