Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रईपीएफओ मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत, कर्मचाऱ्यांना होणार असे फायदे

ईपीएफओ मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत, कर्मचाऱ्यांना होणार असे फायदे

पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंड. दरमहिन्याला पीएफधारकांच्या पगारातून एक ठराविक रक्कमेचा काही भाग हा पीएफ खात्यात जमा केला जातो. तसेच कंपनीकडूनही काही भाग हा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी पीएफ खात्यातील रक्कम ही भविष्यातील कोणत्याही चांगल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठी मोठा दिलासा देणारी असते. अनेकांनी आतापर्यंत पीएफमधील रक्कमेच्या मदतीने खूप काही केलंय. पीएफधारकांना वारंवार चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ईपीएफओ पर्यायाने केंद्र सरकार अनेक निर्णय घेत असते. आता ईपीएफओ असेच काही निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निर्णयामुळे पीएफधारकांचं काम चुटकीसरशी होणार आहेत.

 

केंद्र सरकारने आयकर विभागासाठी पॅन 2.0 हा प्रकल्प मंजूर केला आहे. केंद्र सरकार त्याच पार्श्वभूमीवर EPFO 3.0 आणण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने EPFO 3.0 ही योजना आणल्यास पीएफधारकांची अनेक कामं सहज होतील, असं म्हटलं जात आहे. पीएफ संदर्भातील अनेक कामं ही सर्वसामांन्यांसाठी किचकट आहेत. मात्र केंद्र सरकारने पीएफबाबत नवी योजना लागू केल्यास ही कटकट संपेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

EPFO 3.0 योजनेची अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक पीएफधारक कर्मचारी आपल्या पगारातून किती रक्कम कापली जावी, याचा निर्णय स्वत: घेऊ शकणार आहे. इतकंच नाही, तर पीएफ खात्यातील रक्कम एटीएमने काढता येईल.

 

काय बदल होणार?

दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनातील 12 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. EPFO 3.0 योजनेच्या अंमलबजावनीनंतर, ही अट शिथिल केली जाऊ शकते. त्यामुळे पीएफधारक वाटेल तितकी रक्कम पेन्शन खात्यात जमा करु शकतील. तसेच पीएफ खात्यातील रक्कम एटीएमद्वारे काढता येईल. असं झाल्यास पीएफधारकांची कटकट संपेल. पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच अर्ज केल्यानंतर ठराविक दिवसांनी रक्कम मिळण्याची प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे ही प्रतिक्षाही संपेल.

 

कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनाच्या 12 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या खात्यात 12 टक्के रक्कम जमा केली जाते. या 12 पैकी 8.33 टक्के रक्कम EPS-95 मध्ये जमा केली जाते. तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात टाकली जाते. सरकारकडून यातही मोठा बदल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्यासाठी सरकार लवकरच ईपीएस -95 मध्ये जास्त रक्कम जमा करण्याची मुभा देऊ शकते. त्यामुळे या निर्णयाकडेही कर्मचा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -