भारतामध्ये सापांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. मात्र त्यातील प्रामुख्यानं चारच सापाच्या जाती या विषारी आहेत, ज्यांना बिग 4 नावानं देखील ओळखलं जातं. या सापांमध्ये नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या सापांचा समावेश होतो. यातील मण्यार सापाचं विष इतकं खतरनाक असंत की तो चावल्यानंतर जर योग्य वेळेत उपचार मिळाले नाहीत तर व्यक्तीचा मृत्यू होतो. मण्यारचा मृत्यू रेट हा घोणस, नाग, फुरसे या प्रमुख विषारी जातींपेक्षा सर्वाधिक आहे. या प्रजातीच्या सापाला सायलंट किलर असं देखील म्हटलं जातं. कारण हा साप जेव्हा चावतो तेव्हा एखादी मुंगी किंवा डास चावला आहे, असा भास होतो. त्यामुळे आपण बेसावध राहातो. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं ज्याला या सापानं चावा घेतला आहे, तो व्यक्ती दगावण्याची शक्यता सर्वाधिक असते. हे साप दिवसा नाही तर रात्रीच्या अंधारात आपल्या शिकारीच्या शोधात निघतात, त्यामुळे या सापांच्या चाव्याचं प्रमाण देखील अधिक असतं. हा साप चावल्यानंतर लगेचच त्याच्या विषाचा परिणाम दिसून येत नसल्यानं त्याबाबत माहिती मिळत नाही, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
भारतातील सर्वात विषारी साप
उपलब्ध माहितीनुसार मण्यार जातीचे साप हे भारतासोबतच बंगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि पाकिस्तानात देखील आढळतात.भारतात जे चार प्रमुख विषारी साप आढळतात त्यामध्ये या सापाचा समावेश होतो. हा साप चावण्याचं प्रमाण थंडीच्या दिवसात अधिक असंत.
या सापाला कसं ओळखावं?
हा साप निशाचर आहे, तो फक्त रात्रीच आपल्या भक्षाच्या शोधात बिळातून बाहेर पडतो. सहजासहजी हा साप दिवसा आढळून येत नाही. हा साप चावल्यानंतर त्याचे दाताचे निशाण देखील चावलेल्या ठिकाणी सापडत नाहीत. एखादा काटा टोचावा किंवा मुंगी चावावी फक्त एवढंच जाणवतं. हा साप चावल्यानंतर शरीरात कोणतेही लक्षण दिसून येत नाहीत, मात्र जेव्हा साप चावल्याचं लक्षात येत तोपर्यंत खूप उशिर झालेला असतो. एक तर उपचाराला विलंब झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा त्याला अर्धांगवायुचा झटका येतो.मण्यार साप हा दिसायला काळ्या आणि तपकिरी कलरचा असतो. तो साप ओळखण्याची सोपी युक्ती म्हणजे त्याच्या शरीरावर एक विशिष्ट चमक असते. तसेच त्याच्या शरीरावर एका ठराविक अंतराने सर्वत्र दोन पांढऱ्या कलरच्या पट्ट्या असतात.
हा साप चावल्यानंतर तुमच्या हातात जास्तीत जास्त दीड ते दोन तास असतात, त्यावेळेत जर रुग्णाला योग्य उपचार मिळाला तर तो वाचू शकतो. हा साप चावल्यानंतर संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरांकडे न्यावं, डॉक्टरांना सापाबाबत माहिती द्यावी, रुग्णाने देखील घाबरून न जाता मन शांत ठेवावं. ज्यामुळे उपचाराचा लवकरात लवकर परिणाम होऊन रुग्णाचा जीव वाचू शकतो.