सॅमसंगने भारतीय बाजारात एकापेक्षा एक स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याचा धडाका लावला आहे. आता कंपनीने बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या Galaxy F16 5G स्मार्टफोनला लाँच केले आहे.
या फोनची विक्री कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल.
15 हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या सॅमसंगच्या या फोनमध्ये एकापेक्षा एक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स मिळतील. या फोनच्या किंमत-फीचर्सविषयी जाणून घेऊयात.
Samsung Galaxy F16 5G चे फीचर्स
Samsung Galaxy F16 5G मध्ये U-शेप्ड नॉचसह येणारा 6.7 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, स्क्रीन 1080 x 2340 पिक्सल FHD+ रिझॉल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करते. फोनसोबत कंपनी 6 वर्ष Android OS अपग्रेड देत आहे.
सॅमसंगचा हा फोन डायमेंशन 6300 चिपसेट, 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज वाढवता येईल. यात 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
गॅलेक्सी एफ16 मध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. तसेच, बॅक पॅनेलवर 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर दिला आहे. यात 5जी सपोर्ट आणि साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.
Samsung Galaxy F16 5G ची किंमत
Samsung Galaxy F16 5G ची भारतातील किंमत 11,499 रुपये आहे. ही किंमत लाँच ऑफरची आहे. विक्री सुरू झाल्यानंतरच फोनची अधिकृत किंमत समोर येईल. कंपनीने फोनला वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. मात्र, या व्हेरिएंट्सची किंमत अद्याप समोर आलेली नाही.