नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला. सोमवारी केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडर अर्थातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्यात.
सोमवारी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक मोठा धक्का बसलाय. महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील वाढवल्या गेल्या आहेत.
LPG Gas Cylinder Price
म्हणजे सामान्य ग्राहकांना तसेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देखील या दरवाढीचा फटका बसणार आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब महिलांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आठ एप्रिल 2025 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या असून ज्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना एक मोठा फटका बसला आहे.
मात्र असे असले तरी देशातील काही ग्राहकांना गॅस सिलेंडर अजूनही 303 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण शासनाच्या या दरवाढीनंतरही कोणत्या ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त मिळणार? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या ग्राहकांना तीनशे रुपयांनी स्वस्त मिळणार एलपीजी गॅस सिलेंडर
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी महाग झाल्या आहेत. या दरवाढीनंतर सामान्य ग्राहकांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 853 रुपयांना मिळणार आहे. मात्र उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर फक्त 553 रुपयांना मिळणार आहे.