Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित या तीन संघांवर, पराभूत करावं तर लागणारच; कारण…

मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित या तीन संघांवर, पराभूत करावं तर लागणारच; कारण…

आयपीएल 2025 स्पर्धेत आतापर्यंत 31 सामन्यांचा खेळ संपला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने म्हणजेच टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याची धडपड सुरु झाली आहे. काही संघांचं जर तरच गणित सुरु झालं आहे. तळाशी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचं गणित तर खूपच किचकट झालं आहे. एखाद दुसऱ्या सामन्यात पराभव झाला तर या स्पर्धेतून आऊट होणारा पहिला संघ ठरेल. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचीही काहीशी अशीच स्थिती आहे. तर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे टॉप 4 च्या शर्यतीत आहेत. गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स टॉप 4 मध्ये आहेत. अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून कोणीही बाहेर पडलेलं नाही. पण टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघांचं एक वेगळं गणित आहे. टॉप 4 मधील संघांची स्थिती पाहता सहज 24 ते 22 गुणांपर्यंत मजल मारतील अशी शक्यता आहे. तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं तर 16 गुण पात्र ठरतील. अशा स्थितीत मुंबई इंडियन्ससाठी गणित कसं असेल ते समजून घ्या..

 

मुंबई इंडियन्सला 16 अंकांचं गणित सोडवायचं तर उर्वरित 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. म्हणजे सहा संघांना पराभूत करणं भाग आहे. त्यातल्या त्यात टॉप 4 मधील संघांना पराभूत केलं तर 24 ते 22 गुणांची मजल आणखी कमी होऊ शकते. म्हणजेच ते 12 गुणांपर्यंत येऊ शकतं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला हे गणित सोपं करायचं असेल तर टॉप 4 मधील संघांना पराभूत करणं भाग आहे. मुंबई इंडियन्स हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 6 सामने खेळले असून यापैकी चार सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचे 4 गुण असून +0.104 नेट रनरेट आहे. अशा स्थिती मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठी कठीण लढाई द्यावी लागणार आहे.

 

टॉप 4 मध्ये स्थान मिळावयचं असेल तर तीन संघांना काहीही करून पराभूत करणं गरजेचं आहे. कारण तेव्हाच टॉप 4 संघांमध्ये उलथापालथ होऊ शकते. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सला पराभूत करावं लागणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी या स्पर्धेत एकमेव सामना होता आणि तो आरसीबीने जिंकला आहे.

 

मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2 सामने, तर उर्वरित सहा सामने चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मुंबईने दिल्लीला पहिल्या सामन्यात पराभूत केलंआहे. तर गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर पंजाब किंग्सशी एकमेव सामना होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -