Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रWhatsApp वर ब्लॉक झाल्यावरही Msg करता येणार? जाणून घ्या सोपे मार्ग

WhatsApp वर ब्लॉक झाल्यावरही Msg करता येणार? जाणून घ्या सोपे मार्ग

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअँप (WhatsApp) हे एक महत्त्वाचं इन्स्टंट मेसेजिंग अँप बनलं आहे. लाखो लोक वैयक्तिक अन व्यावसायिक कारणांसाठी याचा वापर करत असतात. मात्र, काहीवेळा मतभेद, वाद किंवा नात्यांतील दुरावा यामुळे एखादी व्यक्ती दुसऱ्याला व्हॉट्सअँपवर ब्लॉक करते. ब्लॉक झाल्यानंतर त्या व्यक्तीशी ना मेसेज करता येतो, ना कॉल. पण काही तांत्रिक मार्ग वापरून, ब्लॉक असतानाही त्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधणं शक्य आहे. तर ते कस हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग –

सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे व्हॉट्सअँप (WhatsApp) ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधणे. तुम्हाला ब्लॉक केले असले, तरी थेट ग्रुपमधून मेसेज पाठवता येतो. मात्र, यासाठी एक तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते , तो/ती एक ग्रुप तयार करून तुम्हा दोघांना त्यात ऍड करतो. एकदा का तुम्ही ग्रुपमध्ये आला, की तुम्ही मेसेज पाठवू शकता आणि त्या व्यक्तीपर्यंत तुमचा मेसेज पोहोचू शकतो.

 

दुसरा मार्ग –

दुसरा मार्ग म्हणजे तुमचं सध्याचं व्हॉट्सअँप अकाऊंट डिलीट करून त्याच मोबाईल नंबरवरून नवीन अकाऊंट तयार करणं. हे करताना तुमची ब्लॉक लिस्ट ‘रीसेट’ होते आणि पुन्हा एकदा तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. मात्र, हे करताना आधी व्हॉट्सअँपचा बॅकअप घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे जुने मेसेज आणि मीडिया हरवणार नाहीत.

 

तिसरा पर्याय –

तिसरा पर्याय आहे , जर तुमच्याकडे दोन सिम असतील तर दुसऱ्या सिमवर नवीन व्हॉट्सअँप अकाऊंट तयार करा अन त्यावरून संपर्क साधा. हा पर्याय अतिशय सोपा आहे, पण याचा उपयोग करताना नैतिकतेचा आणि दुसऱ्याच्या निर्णयाचा सन्मान राखणं अत्यावश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -