अनेकदा आपले Gmail अकाउंटचे स्टोरेज फुल होते आणि यामुळे तुम्हाला महत्त्वाचे मेल येत नाही. याचा अनेक युजर्सला त्रास होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या उपाय करुन तुम्ही Gmail चे स्टोरेज सहजपणे खाली करू शकता.
Google प्रत्येक Gmail अकाउंटसोबत 15 GB स्टोरेज मोफत देतो. मात्र, अनेकदा हे स्टोरेज लवकर भरते. यासाठी काही विशिष्ट ट्रिक्सचा वापर करत तुम्ही Gmail चे स्टोरेज पुन्हा मिळवू शकता.
सर्वात आधी तुमच्या Gmail मधील मोठे अटॅचमेंट असलेले ईमेल शोधा आणि त्यांना डिलीट करा. कोणते ईमेल जास्त जागा घेत आहेत हे शोधण्यासाठी Gmail च्या सर्च बारमध्ये larger:10M असे टाईप करून सर्च करा. त्यात तुम्हाला १० MB पेक्षा मोठे असलेले सर्व ईमेल दिसतील, जे तुम्ही डिलीट करू शकता.
अनेकदा आपण फक्त इनबॉक्समधील ईमेल डिलीट करतो, पण स्पॅम फोल्डरकडे दुर्लक्ष करतो. स्पॅम फोल्डरमध्येही अनावश्यक ई-मेल जमा होतात. त्यामुळे ते डिलिट करणे गरजेचे आहे.
काही ईमेल हे १ वर्षापेक्षा जुने असतात. ते ईमेल शोधून डिलीट करा. यासाठी Gmail च्या सर्च बारमध्ये “older_than:1y” असे टाईप करून सर्च करा. यात तुम्हाला १ वर्षापेक्षा जुने ईमेल मिळतील. जे तुम्ही लगेच डिलीट करू शकता.
एक लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारे १५ GB स्टोरेज फक्त Gmail साठी नाही, तर त्यात Google Drive आणि Google Photos चा देखील समावेश असतो. त्यामुळे Drive आणि Photos मधील अनावश्यक फाईल्स आणि फोटो डिलीट करुन तुम्ही स्टोरेज वाचवू शकता.
जर तुम्हाला काही ईमेल आयडीवरून वारंवार अनावश्यक ईमेल येत असतील, तर तुम्ही त्या आयडींना ब्लॉक करू शकता. यासाठी त्या सेंडरचा कोणताही ईमेल ओपन करा आणि राईट साईडला असलेल्या थ्री डॉट्सवर क्लिक करा. त्यात तुम्हाला ब्लॉक करण्याचा पर्याय दिसेल.
सोप्या उपायांमुळे तुम्ही तुमच्या Gmail अकाउंटचे स्टोरेज सहजपणे हाताळू शकता. यामुळे तुम्ही पुन्हा एकदा ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी नवीन जागा तयार करु शकता.