Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीआमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याने दिव्यांगांना आयजीएम मधून दाखले मिळणार

आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याने दिव्यांगांना आयजीएम मधून दाखले मिळणार

येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वाटप कक्षाचे उद्घाटन व प्रमाणपत्र वाटप शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त रुग्णालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अमित सोहनी आदी उपस्थित होते.

इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे शहर परिसर तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यासह नजीकच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी मोठा आधार बनले आहे. परंतु इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विविध शासकीय योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना अंधत्व, अपंगत्व याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैसा वाय जात होते. शिवाय तांत्रिक बाबी निर्माण झाल्यास पुन्हा हेलपाटा मारावा लागत असल्याने या लाभार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत होता. या संदर्भात लाभार्थ्यांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन अंधत्व अथवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातच मिळावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार आवाडे यांनी या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक बुधवारी याठिकाणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या या कामामुळे दिव्यांगांचा त्रास वाचला आहे.

याप्रसंगी संगांयो समिती अध्यक्ष अध्यक्ष अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, संजय केंगार, श्रीरंग खवरे, रमेश पाटील, नरसिंह पारीक, सतिश मुळीक, दिलीप शिंदे, बाळासाहेब माने, कोंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, संजय नागुरे, प्रमोद बचाटे, नितेश, पोवार, रुग्ण कल्याण समिती सदस्य कपील शेटके, विजय पाटील, दिव्यांग संघटनांचे प्रतिनीधी गेजगे, पोतदार तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -