Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रकाय सांगता? सोनं 19 हजारांनी होणार स्वस्त? ‘या’ एका कारणामुळे भाव गडगडणार?

काय सांगता? सोनं 19 हजारांनी होणार स्वस्त? ‘या’ एका कारणामुळे भाव गडगडणार?

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली. सोन्याने एक लाखाचा टप्पाही पार केल्याचं आपण पाहिलं. आता मात्र सोन्याच्या दरात घसरण होत असलेली पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता सोने भविष्यात तब्बल 19 हजारांनी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 19 हजारांनी सोनं स्वस्त का होऊ शकतं? त्यामागे नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊ या…

 

सोनं होऊ शकतं स्वस्त

सोन्याने काही दिवसांपूर्वी प्रति तोळा 1 लाख रुपयांचा आकडा पार केला होता. आता मात्र सोने साधारण 7 ते 8 हजारांनी कमी झालेले आहे. असे असतानाच आगामी चार ते सहा महिन्यांत सोन्याचा भाव ऑल टाईम हायवरून थेट 19 हजारांनी कमी होऊ शकतो.

 

सोनं किती रुपयांनी स्वस्त होणार?

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी आगामी चार ते सहा महिन्यांत सोनं 80 हजारांपर्यंत कमी होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली आहे. सोन्याचा भाव भविष्यात 80 ते 85 हजार प्रति दहा ग्रॅम होण्याची शक्यता आहे, असं भाकित त्यांनी केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयात करारात वाढ केल्यामुळे सोन्याच्या भावात ही वाढ झाली होती. ट्रम्प यांनी आयात कराराबाबत थोडी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता जागतिक बाजारात स्थिरता पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या भावातही घसरण झाली होती. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता आगामी काळात सोन्याचा भाव 80 हजारांपर्यंत कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

 

सोन्याचा भाव कमी होण्याची कारणं काय?

तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना साधारण 21 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत. एका वर्षात सोन्याने साधारण 32 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या मागे अनेक कारण आहे. जागतिक पातळीवरील तणाव, भूराजकीय परिस्थिती यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सध्या मात्र जागतिक पातळीवरील तणाव निवळला आहे. अमेरिका रशिया आणि युक्रेन यांच्यात कायमस्वरुपी शस्त्रसंधी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सोन्याच्या भाववाढीसाठी जी अनुकूल स्थिती झाली होती, ती सध्या राहिली नाही. त्यामुळेच सोन्याच्या दरात घट होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -