गोकुळने दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. सोमवारपासून (दि. 5) ही दरवाढ लागू होईल. ग्राहकांना लिटरला आता दोन रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
गोकुळच्या दुधाला कोल्हापूरसह मुंबई, पुणे शहरांमध्ये मोठी मागणी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात साधारणपणे 1 लाख 75 हजार लिटर, पुणे येथे 4 लाख 50 हजार व मुंबईत 8 लाख 70 हजार लिटर दुधाची विक्री होत असते. काही दिवसांपूर्वी म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला होता. यामुळे निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी गोकुळने दूध विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.