Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाआयपीएलवर महत्वाचे अपडेट, देशभरात होणार सामने…कधी होणार नवीन तारखांची घोषणा

आयपीएलवर महत्वाचे अपडेट, देशभरात होणार सामने…कधी होणार नवीन तारखांची घोषणा

भारत-पाकिस्तान तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 स्थगित करण्यात आली होती. परंतु आता दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीचा निर्णय झाला. त्यामुळे आयपीएल पुन्हा देशभरात सुरु होणार आहे. बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता सामने केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात होणार आहे. सामन्याची नवीन तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. आयपीएलचे अजून १६ सामने राहिले आहेत.

 

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे आता केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात सामने होणार आहे. यापूर्वी आयपीएलची सामने केवळे बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये होणार आहे, असे वृत्त आले होते.

 

बीसीसीआयची महत्वाची बैठक आज होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत आयपीएलचे सामने पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय होणार आहे. काही खेळाडू त्यांच्या देशात परत गेले आहे. त्यांची उपलब्धता लक्षात घेऊन आयपीएल सामन्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -