मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे पुलावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तरुण दुचाकीस्वार ठार झाला. आदित्य बनसोडे (वय 22, रा. पंढरपूर चाळ, मिरज) असे त्याचे नाव आहे.
आदित्य बनसोडे हा दुचाकीवरून शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मिरजहून सांगलीकडे निघाला होता, तर कारचालक सांगलीहून मिरजकडे येत होता.
दोघेही रेल्वे पुलावर आल्यानंतर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, आदित्य याच्या दुचाकीचा चक्काचूर झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत आदित्य याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.