Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रयुद्ध थांबताच शेअर बाजार तेजीत; Sensex 2000 अंकांनी वधारला

युद्ध थांबताच शेअर बाजार तेजीत; Sensex 2000 अंकांनी वधारला

भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर शेअर बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे. आज सोमवारी बाजाराच्या पहिल्याच दिवशी Sensex आणि Nifty मध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळालं.Sensex २००० अंकांनी वधारला आहे तर दुसरीकडे निफ्टीने 24600 चा आकडा पार केला आहे. यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांच्या चिंता काही प्रमाणात कमी झाल्यात. भारत- पाकिस्तान मधील युध्दविरामानंतर आज प्रथमच शेअर बाजार उघडला आहे.

 

गेल्या आठवड्यात मोठी घसरण झालेला सेन्सेक्स-निफ्टी (Share Market Today) आज मात्र तेजीत उघडला. एकीकडे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सचा इंडेस्क्स, सेन्सेक्स, उघडताच १९०० अंकांपेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करण्यास सुरुवात करू लागला, तर दुसरीकडे नेशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील ५५० अंकांच्या वाढीसह उघडला. बाजारातील तेजीनंतर, बीएसई सेन्सेक्सने ८०,८०३.८० च्या पातळीवर व्यवहार सुरू केला, जो त्याच्या मागील बंद ७९,४५४.४७ पेक्षा १५०० अंकांनी जास्त होता आणि नंतर काही मिनिटांतच तो १९२६ अंकांनी वाढला आणि ८१,३८० च्या आसपास व्यवहार सुरू केला. सकाळी ९.५३ वाजता, सेन्सेक्स २००९ अंकांनी आणि निफ्टी ६०० अंकांनी वधारला होता.

 

कोणकोणते स्टॉक तेजीत? Share Market Today

सध्याच्या मार्केट मध्ये अ‍ॅक्सिस बँक (४%), रिलायन्स शेअर (३.२३%), अदानी पोर्ट्स (३.८८%), बजाज फायनान्स शेअर (३.६१%), एचडीएफसी बँक शेअर (२.८५%), टाटा स्टील शेअर (३.४०%), इटरनल शेअर (३.६१%), बजाज फिनसर्व्ह (३.७५%) या कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत.

 

शुक्रवारी मोठी घसरण झाली-

गेल्या आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसांत भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. शुक्रवारी, बीएसई सेन्सेक्सने ७८,९६८ च्या पातळीवर व्यवहार सुरू केला, जो त्याच्या मागील बंद ८०,३३४.८१ पासून घसरला आणि दिवसभर तो लाल रंगातच राहिला. बाजार बंद होईपर्यंत त्याची घसरण कमी झाली असली तरी अखेर सेन्सेक्स ८८०.३४ अंकांनी घसरून ७९,४५४.४७ वर बंद झाला होता. सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टी देखील शेअर बाजारातील व्यवहार बंद होताना २६५.८० अंकांनी घसरून २४,००८ वर बंद झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -