Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रनिकालापूर्वीच महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; १० विच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

निकालापूर्वीच महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; १० विच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

नुकताच ५ मेला १२ विचा निकाल जाहीर झाला. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहे. आता ही परीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.

 

अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल पाहता येणार आहे. आता दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे दहावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

महाराष्ट्र बोर्डाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करत अकरावी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक आणि एकसंध असावी, यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

 

या महाराष्ट्र बोर्डाच्या निर्णयानुसार, संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालये सरकारने निर्धारीत केलेल्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरच प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. चार फेऱ्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या चार फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, उर्वरित रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे. प्रवेश अर्ज सादर करतांना विध्यार्त्यांना त्यांचे वैयक्तिक माहितीपत्रक, गुणपत्रक व प्राधान्यक्रमानुसार निवडलेली महाविद्यालयांची यादी ऑनलाइन प्रणालीत भरावी लागेल.

 

१० विचा निकाल कोणत्या संकेत स्थळांवर येणार पाहता

 

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतील. महाराष्ट्र बोर्डाचे निकाल mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in वर पाहता येतील. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख यासारखी माहिती भरावी लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -