करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंगळवारी देवस्थान समितीच्या वतीने धोतरसद़ृश वस्त्र देण्यात आले.
मंदिरात लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील चारही प्रवेशद्वारांवर ही सुविधा देण्यात आली; मात्र ही सुविधा कायमस्वरूपी उपाय नसून ड्रेस कोड निर्णयाची माहिती व्हावी, यासाठी पर्याय असल्याचे देवस्थान समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येताना पारंपरिक वेशभूषा परिधान करावी असा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. मंगळवार, दि. 13 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर येथे जे भाविक बर्म्युडा, शॉर्ट पँट, केप्री, स्लिव्हलेस ड्रेस घालून आले होते त्यांना देवस्थानतर्फे पुरवण्यात आलेले धोतर नेसून तसेच उपरणे पांघरूनच मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे बुधवारी अंबाबाई मंदिरातील मुख्य दर्शन रांग असलेल्या पूर्व दरवाजा, घाटी दरवाजा, दक्षिण दरवाजा व महाद्वार येथील प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकांकडून तोकड्या कपड्यातील भाविकांना ड्रेसकोड नियमावलीची माहिती व वस्त्र देण्यात येत होते.
ड्रेसकोड नियमाबाबत भाविक अनभिज्ञ
मंगळवारपासून अंबाबाई मंदिरात ड्रेसकोड लागू झाला असला, तरी बुधवारी काही पर्यटक भाविक शॉर्ट कपडे घालून दर्शनासाठी आले होते. यामध्ये बर्म्युडा, हाफ पँटमध्ये पुरुष भाविकांचा, तर स्कर्ट, स्लीव्हलेस ड्रेसमध्ये महिला भाविकांचा समावेश होता. ड्रेसकोड नियमाबाबत माहिती नसल्याने ते सुरक्षा रक्षकांना सांगत होते. नियमावली लागू झाल्याचा दुसराच दिवस असल्याने देवस्थानच्या वतीने परगावच्या भाविकांसाठी तात्पुरते वस्त्र देण्याची सुविधा दिली; मात्र येत्या आठवड्यापासून ही सुविधा बंद करण्यात येईल व पारंपरिक कपडे परिधान करणे बंधनकारक केले जाईल, अशी माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली.
– यामिनी शिसवेकर,भाविक, नागपूरमंदिरात येत असताना आपले भाव हे सात्विक असणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरात पारंपरिक वेशभूषा करून गेले पाहिजे. अंबाबाई देवस्थानने घेतलेला निर्णय चांगला आहे.- देविदास हरदास,देवास, मध्य प्रदेशआजकाल ट्रीपला जायचे म्हटले की, त्या-त्या ठिकाणाप्रमाणे कपडे खरेदी केले जातात. समुद्रकिनारी जाताना शॉर्ट कपडे घातले जातात, तर मंदिरात येताना पारंपरिक कपडे घातलेच पाहिजेत. त्यामुळे अंबाबाई मंदिरातील ड्रेसकोड नियम स्तुत्य आहे.सीताराम बागलकोटे, हुबळीदक्षिण भारत, उत्तर भारत येथील बहुसंख्य मंदिरांमध्ये ड्रेसकोड आहे आणि तेथे जाणारे पर्यटक भाविक तो नियम पाळतात. अंबाबाई मंदिरात येणार्या भाविकांनीही या नियमाचे पालन करावे असे वाटते. हा निर्णय योग्य आहे.