Saturday, January 17, 2026
Homeकोल्हापूरkolhapur : चोरट्यास अटक; 7 वाहने हस्तगत

kolhapur : चोरट्यास अटक; 7 वाहने हस्तगत

शहर, उपनगरांसह जिल्ह्यात तसेच सीमाभागातून महागडी दुचाकी वाहने चोरणार्‍या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी अटक केली. अमित चंद्रकांत हत्तीकोटे (वय 35, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 4 लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याने 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

 

संशयिताकडून कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव जिल्ह्यातीलही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. त्याच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत आहे. असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत त्याच्याकडून जुना राजवाडा, शाहूपुरीतील दोन, गोकुळ शिरगाव येथील चार गुन्हे उघडकीला आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

संशयित अमित हत्तीकोटे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरातून त्याने वाहनांची चोरी केली आहे. महागड्या दुचाकी चोरायच्या आणि दहा-बारा हजार रुपयांत त्याची विक्री करून मौजमजेवर पैसा उधळायचा. चोरीच्या गुन्ह्यातील वाहन विक्रीसाठी संशयित निर्माण चौक, मैल खड्डा परिसरात येणार असल्याची पथकाला खबर लागली. उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, गजानन गुरव यांच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीशिवाय आणखी 5 दुचाकींचीही चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे, असेही कळमकर म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -