Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू; दीड तासाचा प्रवास, पाहा वेळापत्रक

कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू; दीड तासाचा प्रवास, पाहा वेळापत्रक

कोल्हापूरला थेट राज्याच्या उपराजधानीशी जोडणारी कोल्हापूर-नागपूर विमानसेवा गुरुवारी सुरू झाली आहे. स्टार एअरवेज कंपनीने ही सेवा सुरू केली असून, यामुळे कोल्हापूरचा उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

 

तसेच, कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळूर या मार्गांवरही १६ मे पासून नव्या विमानसेवा सुरू होत आहेत.

 

कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर ही विमानसेवा आठवड्यातील पाच दिवस – मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार – उपलब्ध असेल. या सेवेत १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास अशी एकूण ७६ आसनांची व्यवस्था आहे.

 

वेळापत्रक पुढीलप्रमाणे…

 

नागपूर ते कोल्हापूर : सकाळी १०.०० वाजता उड्डाण, सकाळी ११.३० वाजता कोल्हापुरात आगमन.

कोल्हापूर ते नागपूर : दुपारी १२.०० वाजता उड्डाण, दुपारी १.३० वाजता नागपूरमध्ये आगमन.

 

या सेवेमुळे कोल्हापूर आणि नागपूरमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. तसेच, दोन्ही शहरांमधील व्यापारी, व्यावसायिक आणि पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल.

 

वेळापत्रक खालीलप्रमाणे…

 

हैदराबाद ते कोल्हापूर : सकाळी ९.३५ वाजता उड्डाण, सकाळी १०.४० वाजता कोल्हापुरात आगमन.

कोल्हापूर ते हैदराबाद : दुपारी ३.०० वाजता उड्डाण, दुपारी ४.०५ वाजता हैदराबादमध्ये आगमन.

 

कोल्हापूर ते बंगळूर : सकाळी ११.०५ वाजता उड्डाण, दुपारी १२.३५ वाजता बंगळुरूमध्ये आगमन.

बंगळुरू ते कोल्हापूर : दुपारी १.०५ वाजता उड्डाण, दुपारी २.३५ वाजता कोल्हापुरात आगमन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -