Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रएक जूनपासून बदलणार हे नियम; खिशावर वाढणार भार

एक जूनपासून बदलणार हे नियम; खिशावर वाढणार भार

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बँका आपल्या व्यवहाराच्या नियमात बदल करत असतात. (pockets)पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जून 2025 पासून काही नियम बदलणार आहेत. अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडर ते क्रेडिट कार्ड अशा गोष्टींच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये ईपीएफओच्या बाबत नवीन नियम लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.सरकार ईपीएफओची नवीन आवृत्ती 3.0 लाँच करणार आहे, ज्यामुळे पीएफ काढणे, डेटा अपडेट करणं आणि पैसे काढण्यासाठी क्लेम करणं सोपं होणार आहे. तसेच पीएफचे पैसे एटीएम कार्डमधून पैसे काढता येण्याची सुविधा देखील ईपीएफओमार्फत दिली जाणार आहे.

 

जूनपासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू केले जाण्याची शक्यता आहे. ऑटो-डेबिट फेल्युअरवर 2% दंड, युटिलिटी बिलांवर आणि इंधन खर्चावर अतिरिक्त शुल्क, (pockets)आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आणि रिवॉर्ड पॉइंट्स सिस्टममध्ये कपात होण्याची शकता आहे.एटीएम व्यवहार नियमांमध्ये काही बदल होऊ शकतात. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ होईल.

 

म्हणजेच, एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन शुल्क लागतील. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत महत्त्वाचे बदल होतात. त्यामुळे 1 जून 2025 रोजी गॅस सिलिंडरची किंमत कमी किंवा वाढू शकते(pockets). 1 जून रोजी एफडी व्याजदरात वाढ किंवा घसरण होऊ शकते. बहुतेक बँका 6.5% ते 7.5% दरम्यान व्याज देत असल्या , जूनपासून हे दर देखील कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -